Lakshmi Niwas : 'लक्ष्मी निवास' मालिकेत लगीनघाई! जान्हवी-जयंतच्या लग्नाला पारु अन् आदित्य लावणार चारचांद

झी मराठीवर 'लक्ष्मी निवास' आणि 'पारू' या मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे. एकीकडे जयंत-जान्हवीचं लग्न आणि दुसरीकडे आदित्य-अनुष्काचा साखरपुडा या दोन्ही मंगलकार्याची तयारी जोरदार सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लक्ष्मी निवास मालिकेमध्ये जयंत आणि जान्हवीच्या लग्नासाठी महालात लग्नाचा मांडव सजला आहे. लग्नासाठी दळवी कुटुंब सज्ज आहे. यामध्ये किर्लोस्कर कुटुंब चारचांद लावताना दिसणार आहे.

जयंत आणि जान्हवीच्या लग्नासाठी दळवी कुटुंब सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्याचा सोहळात किर्लोस्कर चारचांद लावायला तयार आहेत. भव्य मंगलकार्यासाठी दळवी आणि किर्लोस्कर कुटुंब एकत्र येत आहेत.
पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवर हे भव्य मंगलकार्य खऱ्या अर्थाने आलिशान महालात पार पडत आहे.
त्याआधी अहिल्यादेवी आणि जयंत मध्ये स्थळासाठीची रस्सीखेच सुरु आहे, त्याच दरम्यान हे उलगडतं की अहिल्या आणि लक्ष्मी मैत्रिणी आहेत. हे ऐकून जयंत म्हणतो की, तुम्ही दोघी मैत्रिणी आहात तर आपण ह्या स्थळावर दोन्ही कार्यक्रम पार पाडू.
दळवी आणि किर्लोस्कर कुटुंब जयंत आणि जान्हवीच्या लग्नातील प्रत्येक विधी एकत्र मिळून उत्साहाने पार पाडतात.
जयंत आणि जान्हवीच्या लग्नात आदित्य आणि पारु डान्स करताना पाहायला मिळतील.
यासोबत जयंत आणि जान्हवी यांचाही खास डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळेल.
जान्हवी आणि जयंत लग्नाच्या पारंपारिक वेशात फारच सुंदर दिसत आहे.
नवरी जान्हवीच्या चेहरा तर खुलून आला आहे.
दोन्ही कुटुंब एकत्रपणे मंगलकार्य पार पाडतील की यामध्ये काही अडचणी येतील, हे येणाऱ्या भागात पाहायला मिळेल.
मात्र, हा आठवडा प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहे, एवढं मात्र नक्की.
या सगळ्यात जयंत जान्हवी लग्न आणि आदित्य-अनुष्काचा साखरपुडा कसा पार पडणार, हे पाहण्यास तुम्ही उत्सुक असालच, तर मग या मालिका पाहायला विसरू नका.
image 16