In Pics : महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील मंडुळी फरसाणची मालकीन Prajakta Mali चे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल
प्राजक्ता माळीचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा गृह उद्योग समुहाचे मंडुळी फरसाण..दिवाळीसाठी विशेष सवलत..50 किलो मंडुळी फरसाण विकत घेतल्यास ग्राहकास प्राजक्ता माळीसोबत 'मंडुळी फरसाण लंच' करण्याची सुवर्ण संधी. अशा मिम्सचा सध्या सोशल मीडियावर पाऊस पडचो आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्राजक्ता माळीची 'जुळून येती रेशीमगाठी' मालिका प्रचंड गाजली होती. त्यात तिने अतीशय लाघवी मुलीचे पात्र साकारले होते. पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राजक्ता करत असल्याने तिच्यावरदेखील अनेक विनोद होत आहेत.
प्राजक्ताला हसायला प्रचंड आवडते त्यामुळेच तिने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करण्याचा निर्णय घेतला होता.
प्राजक्ता माळीचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठीदेखील खास मिम्स बनवण्यात आले आहे.
प्राजक्ताला फरसाण खायला आवडत असल्याने तिच्या फरसाण खाण्यावरदेखील मिम्स बनत आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम आठवड्यातून एकदाच टेलिकास्ट होत असल्याने प्रेक्षकांनादेखील प्राजक्ता आठवड्यातून एकदाच भेटते त्यावरदेखील मिम्स बनत आहेत.