In Pics : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत येणार वळण, प्रशिक्षकाच्या भूमिकेत मिलिंद शिंदे
सुख म्हणजे काय असतं ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. याच मालिकेत आता नवीन वळण येणार आहे. मालिकेत मिलिंद शिंदे प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिकेतील शालिनीसोबत कबड्डीचा डाव जिंकणे गरजेचे आहे. मालमत्ता मिळवण्यासाठी कबड्डीचा डाव जिंकण्याची अट शालिनीने घातली आहे. त्यामुळे शिर्केपाटील कुटुंबाला सामना जिंकणे गरजेचे आहे.
कबड्डीचा सामना जिंकण्यासाठी प्रशिक्षक असणे गरजेचे आहे. याच कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेत मिलिंद शिंदे दिसून येणार आहे.
मिलिंद शिंदे मालिकेत भैरु नावाच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहेत. मिलिंद शिंदेंनी शाळा-कॉलेजमध्ये असताना घेतलेल्या वर्कशॉपची मदत त्यांना हे पात्र साकारताना होणार आहे.
मिलिंद शिंदे म्हणतात, मी कबड्डी कधीच खेळलो नाही आहे. मी शाळा-कॉलेजमध्ये असताना नाटक करायचो. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करत असतात. त्यामुळे मिलिंद शिंदेंना या मालिकेचा भाग होता आले याचा त्यांना आनंद आहे.