PHOTO : होळी रे होळी.... स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये होळी आणि धुळवडीचा जल्लोष
रंगांची मनसोक्त उधळण करुन आपापसातले सारे हेवेदावे विसरायला लावणारा सण म्हणजे होळी. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये होळी आणि धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठिपक्यांची रांगोळी मालिकेत अप्पू आणि शशांकची लग्नानंतरची पहिलीच होळी आहे. कानेटकर कुटुंबात या खास दिवसाची खास तयारी करण्यात आली आहे. पुरणपोळीचा सुग्रास बेत तर आहेच. पण अप्पुच्या इच्छेखातर संपूर्ण कानेटकर कुटुंबाने राधा कृष्णाचं रुप धारण केलं आहे.
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणाऱ्या कानेटकर कुटुंबात होळीच्या सणाला गोकुळ अवतरणार आहे असंच म्हणावं लागेल.
आई कुठे काय करते मालिकेतही दरवर्षी प्रमाणे होळी आणि धुळवड साजरी होणार आहे. कोणताही सण असला की अरुंधतीची आधीपासूनच तयारी सुरू होते. इतकी वर्ष कुटुंबाच्या आनंदात आपला आनंद शोधणारी अरुंधती यंदा मात्र कोणत्याही बंधनात न अडकता आपल्या इच्छेनुसार सण साजरा करणार आहे.
यंदाचा होळीचा सण सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अंजी पश्यासाठी खास ठरणार आहे. रंगांची उधळण करत हे दोघही आपल्या प्रेमाची कबुली देणार आहेत. खरतर या क्षणाची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यामुळे अंजी पश्याच्या नात्याला नवी कलाटणी मिळणार हे नक्की.
सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील मोरे कुटुंब जल्लोषात होळी आणि धुलिवंदन साजरा करणार आहे.
'सहकुटुंब सहपरिवार'मधली सरु वहिनी
अंजी पश्या प्रमाणेच रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यातही पुन्हा प्रेमाचे रंग भरले जातील का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.
रंग माझा वेगळा मालिकेतील इनामदारांच्या घरात पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा होणार आहे.
मालिकेत आएशा कार्तिकी आणि दीपिकाची मैत्री तोडण्याचा प्रयत्न करत असली तर कॅमेरामागे ती या दोघींसोबत खूपच धमाल करताना दिसली.
मुरांबा मालिकेतही होळीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. रेवासोबत रंग खेळण्याची स्वप्न पाहणाऱ्या अक्षयला योगायोगाने रमासोबत रंग खेळावा लागतो. त्यामुळे अक्षयवर कुणाच्या प्रेमाचा रंग चढणार याची उत्सुकता आहे.