अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या डोक्यावर अक्षता पडल्या; नव्या आयुष्याची सुरुवात, गोड क्षणांचे फोटो केले शेअर
'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात अडकली आहे. (Photo Credit : reshmashinde02/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री रेश्मा शिंदेचा 29 नोव्हेंबर रोजी लग्नसोहळा पार पडला आहे. (Photo Credit : reshmashinde02/instagram)
कुटुंबिय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत रेश्माचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. (Photo Credit : reshmashinde02/instagram)
रेश्मा शिंदेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर नवरदेवासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत खुशखबर शेअर केली आहे. (Photo Credit : reshmashinde02/instagram)
रंग माझा वेगळा, घरोघरी मातीच्या चुली यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री रेशमा शिंदे अखेर लग्नबंधनात अडकली आहे. (Photo Credit : reshmashinde02/instagram)
लग्नाचे फोटो शेअर करताना अभिनेत्री रेश्मा शिंदेने कॅप्शनमध्ये लिहिलंय आयुष्याची नवीन सुरुवात. (Photo Credit : reshmashinde02/instagram)
अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्या नवऱ्याचं नाव पवन आहे. रेश्माने आपल्या होणाऱ्या जोडीदाराविषयी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. (Photo Credit : reshmashinde02/instagram)
रेश्मा आणि पवन लग्नाच्या फोटोमध्ये मॅचिंग वेडिंग लूकमध्ये फार गोड दिसत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. (Photo Credit : reshmashinde02/instagram)
अभिनेत्री रेश्मा शिंदेना आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. तिचं हे दुसरं लग्न आहे. याआधी तिचा घटस्फोट झालेला आहे. (Photo Credit : reshmashinde02/instagram)