PHOTO | मुनमुन दत्ता ते कपिल शर्मा, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागणारे टीव्ही कलाकार
काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत होती. तिने या वक्तव्यामुळे माफीही मागितली होती. परंतु मुनमुन दत्ताच्या आधीही अनेक मोठ्या टीव्ही कलाकारांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. वादग्रस्त वक्तव्यांसाठी माफी मागणाऱ्या या प्रसिद्ध सेलिब्रिटींबाबत जाणून घेणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'ये है मोहब्बतें' या मालिकेतील प्रमुख कलाकार करण पटेल त्याच्या तापट स्वभावासाठी ओळखला जातो. करणनेही 2016 मध्ये भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. करणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टमध्ये लिहिलं होतं की, आमच्या मौनाला चूक समजू नका. जर आम्ही ठरवलं तर जगाचा नकाशा पुन्हा छापावा लागेल, यंदा पाकिस्तानशिवाय..! जय हिंद... भारत माता की जय. पण काही वेळानेच त्याने आपल्या या पोस्टसाठी माफी मागितली होती. त्याने आणखी एक पोस्ट शेअर करताना लिहिलं की, माझ्या आधीच्या पोस्टमुळे काहींच्या भावना दुखावल्या हे मी जाणतो. त्यासाठी मी माफी मागतो. कदाचित मी निवडलेले शब्द चुकीचे होते.
कॉमेडियन कपिल शर्मा, जो आपल्या परफेक्ट कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध आहे, त्यालाही वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागावी लागली होती. मागील वर्षी 'द कपिल शर्मा शो'मध्ये कायस्थ समाजाची थट्टा केली होती. त्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्याने माफी मागितली होती.
'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'चा विजेता कॉमेडियन सुनील पालनेही एका व्हिडीओमध्ये कोविड-19 संकटात डॉक्टरांच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले होते. डॉक्टरांविरोधात अपमानस्पद टिप्पणी केल्याने त्याच्याविरोधात मुंबईतील अंधेरी पोलिसांनी 4 मे, 2021 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुनील पालने सोशल मीडियावर माफीनाम्याचा व्हिडीओ शेअरे केला होता.
शक्तिमान म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी #MeToo मोहिमेविरोधात धक्कादायक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, महिलांनी काम करण्यास सुरुवात केल्यानंतरच #MeToo समस्या निर्माण झाली, असं ते म्हणाले होते. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. यानंतर मुकेश खन्ना यांनी खेद व्यक्त केला होता.
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये बबिता अय्यरची व्यक्तिरेखा साकारणारी मुनमुन दत्ताला काही दिवसांपूर्वी एका वक्तव्यासाठी माफी मागावी लागली होती. एका यूट्यूब व्हिडीओमध्ये जातीवाचक शिवीचा वापर केल्याचा आरोप मुनमुन दत्तावर झाला होता. यानंतर तिच्याविरोधात तक्रारही दाखल झाली होती. यानंतर मुनमुनने आपल्या टिप्पणीसाठी माफी मागितली आणि सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली होती. यात म्हटलं होतं की, माझ्याकडून वापर झालेल्या एका शब्दाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कोणाचाही अपमान किंवा कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी मी हे शब्द वापरले नव्हते. मला या शब्दाबाबत चुकीची माहिती मिळाली होती. जेव्हा मला याचा योग्य अर्थ समजला तेव्हा व्हिडीओमधील तो भाग मी तातडीने हटवला.