In Pics : 'द कपिल शर्मा शो'च्या नव्या सेटची पहिल झलक; नव्या सेटमध्ये हॉटेल, एटीएम आणि बरंच काही...
कॉमेडियन, अभिनेता आणि होस्ट कपिल शर्माने आज द कपिल शर्मा शोच्या नवीन सेटचे फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहून असं वाटतंय की शोमध्ये अनेक गोष्टी नवीन असणार आहेत. या शोच्या सेटचे नवीन फोटो पाहून चाहते खूप आनंदी दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'द कपिल शर्मा शो'ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. गेल्या महिन्यात कपिल शर्माने सोनी टीव्हीवर त्याच्या नवीन सीजनची घोषणा केली होती. मात्र शो कधीपासून टेलिकास्ट होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु प्रेक्षक 'द कपिल शर्मा शो' च्या टीमची वाट पाहत आहेत.
गेल्या वर्षी बंद झालेला कपिलचा शो आता पुन्हा येत आहे. नव्या रुपात येण्यासाठी कपिलची टीम सज्ज झाली आहे. नवीन सीझनमध्ये संपूर्ण सेटचा मेकओव्हर करण्यात आला आहे. यात आता एटीएम मशीन, हॉटेल चिल पॅलेस आणि 10 स्टार स्टोअर तसेच नवीन लाईटिंग सिस्टम आणि सोफा सेट दिसतो आहे.
सेटच्या डाव्या बाजूला आपण पाहू शकता की हॉटेल चिल पॅलेस बांधले गेले आहे. कदाचित एखादा अभिनेता शोमध्ये त्याच्या मालकाची भूमिका बजावेल. तसेच, शोच्या जज अर्चना पूरन सिंह यांची खुर्ची देखील दिसत आहे. उजव्या बाजूस आपण 10 स्टार ढाबा दिसत आहे.
याआधी कपिल शर्माने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. अक्षय त्याच्या आगामी थ्रिलर बेलबॉटमच्या प्रमोशनसाठी शोच्या सेटवर आला होता. फोटोमध्ये अक्षय कपिलच्या पाया पडताना दिसत आहे. कपिलने पोस्टला कॅप्शन दिले की, सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार त्याच्या नवीन बेलबॉटम चित्रपटासाठी आशीर्वाद घेत आहे.