कियारा अडवाणीपासून श्रद्धा कपूरपर्यंत, पहिल्या चित्रपटात अपयशी ठरलेल्या अभिनेत्रींनी नंतर पाडली छाप
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांना पदार्पणाच्या चित्रपटाला फारशी ओळख मिळाली नाही. मात्र, असे असूनही तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीत उच्च स्थान प्राप्त केले आहे. या अभिनेत्रींच्या यादीत कियारा अडवाणी, श्रद्धा कपूर, विद्या बालन, कंगना रनौत यांसारख्या अभिनेत्रींची नावांचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकियारा आडवाणी : कियाराने 2014 मध्ये फगली या चित्रपटाने बॉलिवूड करियरची सुरुवात केली. जी सुपरफ्लॉप ठरली. पण, असे असूनही कियाराने तिचा संघर्ष चालू ठेवला. 2016 मध्ये तिला एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. त्यानंतर 2019 मध्ये आलेल्या कबीर सिंह या चित्रपटाने तिला आणखी उंचीवर नेले. कियाराकडे याक्षणी अनेक मोठे चित्रपट आहेत, त्यातील एक शेरशाह आहे.
श्रद्धा कपूर: श्रद्धाने 2010 मध्ये तीन पत्ती या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. परंतु, तिला 2013 च्या रोमँटिक ड्रामा चित्रपट आशिकी 2 मधून ओळख मिळाली आणि बॉलिवूडमध्ये तिची पावले पुढे जात राहिली.
विद्या बालन : विद्याने 2005 मध्य परिणीता या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटातून तिचे कौतुक झालं. मात्र, दक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताचा बायोपिक द डर्टी पिक्चरमधून तिला खरी प्रसिद्धी मिळाली.
परिणीती चोप्रा : परिणीतीने 2011 मध्ये 'लेडीज विरुद्ध रिकी बहल' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात ती सहाय्यक भूमिकेत दिसली. परंतु, जेव्हा ती इशाकजादेमध्ये मुख्य भूमिकेत दिसले तेव्हा तिला यश मिळाले.
कंगना रनौत : कंगनाने 2006 मध्ये गँगस्टर या चित्रपटातून पदार्पण केले. पण मधुर भांडारकरच्या 'फॅशन' या चित्रपटातून खरी प्रसिद्धी मिळाली. कंगनाला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आणि त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.