स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार' कार्यक्रमात दिवाळी विशेष भाग रंगला 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या कलाकारांसोबत
स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार' कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेतील कलाकार 'मी होणार सुपरस्टार' कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'मी होणार सुपरस्टार'च्या या परिवारासोबत सेलिब्रेशन करताना आनंद द्विगुणीत झाला आहे, अशी भावना सौंदर्या इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हर्षदा खानविलकर यांनी व्यक्त केली आहे.
रेश्मा शिंदे म्हणाली,दिवाळीचं सेलिब्रेशन कुटुंबाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे स्टार प्रवाहच्या परिवारासोबतचा हा धमाकेदार एपिसोड मनोरंजनाचा डबल धमाका असेल.
'रंग माझा वेगळा' मालिकेतील कलाकार या मंचावर आल्यामुळे स्पर्धकांनीदेखील आपल्या डान्समधून या मालिकेचे रंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
स्पर्धकांच्या या अफलातून नृत्यकौशल्याला परिक्षकांनीदेखील उत्तम दाद दिली आहे.
'मी होणार सुपरस्टार' कार्यक्रमाचा दिवाळी विशेष भाग प्रेक्षकांना 30 ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे.