अंकिता लोखंडेसह 'या' टीव्ही सेलिब्रिटींनी बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट नाकारले, नंतर झाला पश्चाताप
दृष्टी धामी ही टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. या अभिनेत्रीने रोहित शेट्टीच्या सिंघम रिटर्न्स चित्रपटाची ऑफर नाकारली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाहीर शेखने स्वत: एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, मला आतापर्यंत अनेक बिग बजेट चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत. परंतु तो सध्या टीव्ही सोडू इच्छित नाही.
धर्मा प्रोडक्शनच्या स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटातून करण टॅकर पदार्पण करणार होते. परंतु. त्याने स्वतःच या चित्रपटातून माघार घेतली.
सुरभी चंदनाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. तिला अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर देखील आल्या आहेत. परंतु, ती सध्या चित्रपटात पदार्पण करण्याच्या विचारात नाही.
मोहित रैनाने बिपाशा बसूचा बिग बजेट चित्रपट क्रिएचर 3D नाकारला होता. त्यानंतर त्याने उरी द सर्जिकल स्ट्राइक आणि शिद्दत या चित्रपटांमध्ये काम केले.
एरिका फर्नांडिसलाही आतापर्यंत अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या आहेत. परंतु, तिने सध्या छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर जाण्याचा विचार केलेला नाही.
कपिल शर्मालाही मोठे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी ऑफर दिली आहे. परंतु, त्याला फक्त कॉमेडी शैलीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. यामुळेच त्याने अनेक बिग बजेट चित्रपटही नाकारले आहेत.
स्टार प्लसवरील शो कसौटी जिंदगी कीमध्ये अनुराग बासूची भूमिका साकारणाऱ्या पार्थ समथान याने गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची ऑफर नाकारली होती. यानंतर संजय लीला भन्साळी यांनी शंतनू माहेश्वरीला ही भूमिका ऑफर केली.
अंकिता लोखंडेला हॅप्पी न्यू इयर आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांची ऑफर आली होती. परंतु, तिने या ऑफर नाकाल्या होत्या. यानंतर तिने मणिकर्णिका या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.