Bigg Boss Marathi 4 : आज रंगणार 'बिग बॉस मराठी 4'चा ग्रॅंड फिनाले
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा आज महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या दिवसाची प्रतीक्षा करत आहेत.
या पर्वात अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), अक्षय केळकर (Akshay Kelkar), अमृता धोंगडे (Amruta Dhongade), किरण माने (Kiran Mane) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) या पाच स्पर्धकांचा 'टॉप 5'मध्ये (Top 5) समावेश झाला आहे.
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
100 दिवसांपूर्वी 16 सदस्यांसोबत या रोमांचक प्रवासाची सुरुवात झाली आणि आता घरात उरले आहेत टॉप पाच (Top 5) सदस्य.
बिग बॉसच्या चौथ्या पर्वातील सदस्य अगणिक टास्क आणि अडचणींना सामोरे गेले.
'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्वदेखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं.
'बिग बॉस मराठी'च्या चौथाचा पर्वाचा महाअंतिम सोहळा 8 जानेवारी रोजी संध्या 7.00 वा. कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या या पर्वाच्या प्रत्येक भागामध्ये झालेल्या टास्कने, वादाने, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
'बिग बॉस मराठी' हा कार्यक्रम काही सदस्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.