Apurva Nemlekar : देवीच्या 'या' रूपातील अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?
रात्रीस खेळ चाले मालिकेतून प्रेक्षकांना आपल्या नजरेने घायाळ करणाऱ्या शेवंताने नवरात्रीत देखील प्रेक्षकांना वेड लावले आहे. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअपूर्वा नेहमीच वेगवेगळ्या पेहरावातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंना तिचे चाहते देखील उत्तम प्रतिसाद देत असतात. त्यामुळे ती वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येते. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)
यंदा नवरात्रीनिमित्त तिने खास फोटोशूट केले आहे. त्यातून भारतातील विविध मंदिरातल्या गाभाऱ्यातील देवींची नऊ रूपं मांडण्याचा तिने प्रयत्न केला आहे. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)
नऊ दिवसांसाठीचं हे फोटोशूट एकाच दिवशी करण्यात आलं आहे. केवळ 22 तासांत हे फोटोशूट पार पडलं आहे.(Photo:@apurvanemlekarofficial/IG)
प्रत्येक देवीचं रूप साकारताना तिला प्रत्येकवेळी नव्याने मेकअप करावा लागत होता.(Photo:@apurvanemlekarofficial/IG)
अपूर्वाने सोशल मीडियावर देवीच्या रुपातील फोटो शेअर केल्यानंतर ती अपूर्वा आहे की गाभाऱ्यातील देवी यावर चाहत्यांचा विश्वासच बसत नव्हता. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)
आतापर्यंत अपूर्वाने कोल्हापूरची अंबाबाई, मुंबादेवी आणि जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप साकारले आहे. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)
तिने प्रत्येक देवीच्या रुपातील फोटोसोबत देवी आणि मंदिराचा इतिहासदेखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)
मी आणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न अशी कॅप्शन देखील तिने प्रत्येक फोटोखाली दिलेली दिसून येते.(Photo:@apurvanemlekarofficial/IG)