PHOTO : लग्न न करताच ‘आई’ झाली अनुषा दांडेकर, सोशल मीडियावर शेअर केले लेकीचे फोटो!
व्हिडीओ जॉकी आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अनुषा दांडेकर तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अनुषा दांडेकर ही अभिनेता करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनुषा आता पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. अभिनेत्रीने तिच्या नव्या पोस्टद्वारे ती आई झाल्याचे जाहीर केले आहे. यासोबतच मुलीचा फोटो शेअर करताना, तिने तिचे नावही जाहीर केले आहे.
अनुषा दांडेकरने तिच्या चिमुकल्या लेकीसह फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'शेवटी माझ्याकडे एक लहान मुलगी आली आहे, जिला मी माझी स्वतःची म्हणू शकते... माझ्या या एंजलचे नाव, सहारा... माझे प्रेम. माझ्या आयुष्यातील मॉन्स्टर आणि गँगस्टर. मी तुझी खूप काळजी घेणार आहे.’
अभिनेत्री अनुषा अद्याप विवाह बंधनात अडकलेली नाही. लग्न करताच तिने बाळाचे स्वागत केले आहे. या अभिनेत्रीची पोस्ट पाहता तिने मुलीला दत्तक घेतल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत.
अनुष्का दांडेकरची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या इंडस्ट्रीतील मित्रपरिवारासह चाहतेही तिला ‘आई’ झाल्याबद्दल शुभेच्छा देताना दिसत आहेत.
अनुषा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडीओंद्वारे चाहत्यांशी कनेक्टेड राहते. याशिवाय अनुषा दांडेकर एक प्रसिद्ध होस्ट, तसेच एक चांगली गायिका आणि जबरदस्त व्हीजे देखील आहे. (Photo : @ vjanusha/IG)