PHOTO : जरीच्या साडीत कशी सजून धजून... रुपाली भोसलेच्या सुंदर फोटोशूटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
फारच कमी दिवसांत छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिकेची कथाच नव्हे तर या मालिकेतील सगळी पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
‘आई कुठे काय करते’ फेम ‘संजना’ म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे.
अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे.
अभिनेत्री रुपाली भोसलेचं लेटेस्ट फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
खास नऊवारी साडी, नाकात भरजरी नथ, साजेसा मेकअप या लूकमध्ये रुपाली खूप सुंदर दिसत आहे.
रुपालीनं नुकतंच हे सुंदर, पारंपारिक फोटोशूट केलं आहे. मराठमोळ्या साजात रुपाली खूप सुंदर दिसतेय.
रुपालीचा हा दिलकश अंदाज चाहत्यांनाही आवडला असून, चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला जात आहे. (Photo : @rupalibhosle/IG)