Keeway K300 N आणि K300 बाईक भारतात लॉन्च, जबरदस्त लूकसह किंमत आहे...
हंगेरियन बाईक उत्पादक कंपनी Keeway ने भारतात आपला दोन नवीन बाईक लॉन्च केल्या आहेत. K300 N आणि K300 R अशी या दोन नवीन बाईकची नावे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयातच Keeway K300 N ची किंमत 2.65 लाख रुपये आहे. तर K300 R ची एक्स-शोरूम किंमत 2.99 लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीने या बाईकची बुकिंग देखील सुरु केली आहे. याची डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीस सुरु होईल.
किवेने दोन्ही बाईक तीन पेंट स्कीममध्ये लॉन्च केल्या आहेत. K300 N मॅट व्हाइट, मॅट रेड आणि मॅट ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
तर K300 R ग्लॉसी व्हाईट, ग्लॉसी रेड आणि ग्लॉसी ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
इंजिनच्या बाबतीत, या दोन्ही बाईकमध्ये 292.4cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, फोर-स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहेत. हे इंजिन 25 Nm च्या पीक टॉर्कसह 27.1 bhp ची कमाल पॉवर जनरेट करतात.
या बाईकचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हार्डवेअरच्या बाबतीत, Keyway K300N ला सोनेरी USD फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक सस्पेन्शन देण्यात आले आहेत.
याशिवाय बाईकमध्ये शार्प एलईडी हेडलाइट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, शार्प फ्युएल टँक आणि स्लिम बॅक डिझाइन देण्यात आली आहे. Keyway च्या स्पोर्टी फुल फेअर बाईक K300R ला LED टेल लाईट आणि LED टर्न इंडिकेटरसह LED हेडलाइट मिळतो. बाईकच्या हेडलाइटमध्ये ट्विन इंटिग्रेटेड एलईडी डीआरएल देखील देण्यात आले आहेत.
या बाईकमध्ये क्लिप-ऑन-हँडल बार उपलब्ध आहे. ही बाईक अधिक आकर्षक बनवण्यासाठी याच्या समोरील बाजूस गोल्डन USD फ्रंट फोर्क्स देण्यात आले आहेत.
या दोन्ही बाईकमध्ये समान क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. याशिवाय दोन्हीमध्ये डिस्क ब्रेक, एबीएस, अलॉय व्हील्स आणि टायर समान आकाराचे आहेत.
Keyway ने भारतीय बाजारपेठेत आपली चार दुचाकी वाहने लॉन्च केली आहेत. ज्यात बाईक आणि स्कूटरचा समावेश आहे. नवीन बाईक्स लॉन्च केल्यामुळे कंपनीने आता एकूण सहा मॉडेल्ससह बाजारात उपलब्ध केले आहेत. भारतात कंपनी बेनेली इंडियाच्या सहकार्याने आपली सर्व वाहने लॉन्च करत आहे.