Aai Kuthe Ky Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत रंगणार भोंड्याचा खेळ
आई कुठे काय करते मालिकेत सगळे सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यामुळे नवरात्रीचा सणदेखील जल्लोषात साजरा झालेला पाहायला मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिकेतील देशमुख कुटुंबाला प्रत्येक सणाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सणाचं पावित्र्य जपत संपूर्ण कुटुंब एकत्र येत आनंद लुटताना दिसून येतात.
सध्या घरात तणावाचं वातावरण असलं तरी कांचन आजीने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे घरात नवरात्री निमित्त भोंड्याचा खेळ रंगणार आहे.
कोकणात नवरात्रीमध्ये भोंडला खेळण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या दिवसात पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. घरातल्या स्त्रिया आणि मुली त्याभोवती फेर धरुन भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.
महिलांसाठी खास असणाऱ्या सणाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबात हा पारंपरिक भोंडला उत्साहात खेळला जाणार आहे.
'मराठी परंपरा मराठी प्रवाह' हे स्टार प्रवाह वाहिनीचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे मालिकांमधून मराठी परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातो. अरुंधती आणि देशमुख कुटुंबाच्या भोंडल्याला मालिके इतकाच प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतील.