Zee Marathi Awards Host 2021: यंदा झी मराठी अवॉर्ड्सचे सूत्रसंचालन करणार बालकलाकार? परी आणि स्वरामध्ये रंगणार सूत्रसंचालनाची जुगलबंदी

स्वरा - परी

1/6
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' कार्यक्रमातील ड्रामा क्वीन अर्थात स्वरा जोशी फक्त गाण्यानेच नाही तर कार्यक्रमातील स्पर्धक आणि परीक्षकांची हुबेहुब नक्कल करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
2/6
"माझी तुझी रेशीमगाठ" या मालिकेतील परीने आपल्या निरागस आणि गोड अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
3/6
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' सुरू झाल्यापासून स्वराला प्रचंड लोकप्रीयता मिळाली. तिच्यात असणारा नौटंकीपणा तिच्या गाण्या इतकाच गोड आहे.
4/6
अल्पावधीतच परी संपूर्ण महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदेसोबत परी करत असलेली धमाल पाहायला प्रेक्षकांना आवडत आहे.
5/6
आता परी आणि स्वरा झी मराठी अवॉर्ड्सच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पडणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे आता अनलिमिटेड मनोरंजन होणार आहे. स्वरा आणि परीचा परीचा प्रोमो प्रदर्शित नुकताच प्रदर्शित झाला आहे त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
6/6
यंदाच्या वर्षी झी मराठी गौरव सोहळ्याचं आकर्षण परी आणि स्वराचं सूत्रसंचालन असणार आहे.
Sponsored Links by Taboola