Tejashri pradhan: तेजश्री प्रधान बॉक्स ऑफिसवर उडवणार धुरळा
पंचक' या सिनेमानंतर तेजश्री आता 'लोकशाही' (Lokshahi) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : instagram/tejashripradhan)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिनेप्रेक्षकांमध्ये या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. 9 फेब्रुवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे(Photo Credit : instagram/tejashripradhan)
या सिनेमात तेजश्री सामाजिक कार्यकर्ती आणि राजकीय घराण्यातील वारसदार इरावती चित्रे नामक पात्र साकारणार आहे.(Photo Credit : instagram/tejashripradhan)
प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवणारा 'लोकशाही' सिनेमा संजय अमर यांनी दिग्दर्शित केला असून सिनेमा 9 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे(Photo Credit : instagram/tejashripradhan)
लोकशाही' सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेमागृहात महाभारतातील पात्रे आणि त्यांच्या सत्ता संघर्षासारखाच आजच्या कलियुगातील माणसांच्या राजकारण आणि राजघराण्यातील सत्तासंघर्षाचा विलक्षण अनुभव घेता येणार आहे(Photo Credit : instagram/tejashripradhan)
. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेआधी तेजश्रीने ह्या गोजिरवाण्या घरात, तुझंनी माझं घर श्रीमंताचं, लेक लाडकी ह्या घरची, अग्गंबाई सासूबाई, फुलाला सुगंध मातीचा या मालिकांमध्ये काम केलं आहे.(Photo Credit : instagram/tejashripradhan)
तेजश्री प्रधानने मालिकांसह सिनेमांतही काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. 'ओलीसुकी','झेंडा','तिची कथा','ती सध्या काय करते','डॉ. प्रकाश बाबा आमटे','लग्न पहावे करुन',शर्यत' अशा अनेक सिनेमांत तेजश्रीने काम केलं आहे. (Photo Credit : instagram/tejashripradhan)
ओलीसुकी'नंतर नववर्षात तेजश्री 'पंचक' (Panchak) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'पंचक' या सिनेमात तेजश्रीची भूमिका छोटी असली तरी महत्त्वाची आहे. त्यातच माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) निर्मित सिनेमात तिला अभिनय करता आला. त्यामुळे नक्कीच हा सिनेमा तिच्यासाठी खूप खास आहे.(Photo Credit : instagram/tejashripradhan)
'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) या मालिकेच्या माध्यमातून तेजश्रीने 2023 मध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. आता 2024 ची सुरुवातही तिने धमाकेदार केली आहे.(Photo Credit : instagram/tejashripradhan)