Photo : छोट्याशा कृतीतून राम चरणने जिंकली लाखो चाहत्यांची मने
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Feb 2023 11:35 PM (IST)
1
अभिनेता राम चरणला साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा गोल्डन बॉय म्हटले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राम चरण याने एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर या चित्रपटाद्वारे त्याच्या स्टारडमला आणखी उंचीवर नेले आहे.
3
चित्रपटांमधील चमकदार अभिनयासोबतच तो त्याच्या नम्र स्वभावासाठीही ओळखला जातो.
4
पुन्हा एकदा त्याने आपल्या कामाने सोशल मीडियावर लोकांची मने जिंकली आहेत.
5
अलीकडेच राम चरण याने औदार्य दाखवून नऊ वर्षांच्या लहान मुलाची इच्छा पूर्ण केली आहे.
6
कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या या बालकाचे नाव रवुला मणि कुशल असून त्याच्यावर स्पर्श रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
7
रुग्णालयाच्या संचालिका नंदिनी रेड्डी यांनी मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले
8
रेड्डी यांच्या प्रयत्नामुळे सुपरस्टार राम चरण याला भेटण्याची मुलाची इच्छा पूर्ण झाली.