Sonam Kapoor : सोनम कपूरने नेसली 35 वर्षे जुनी साडी, पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या चित्रपटांपासून दूर आहे. 2019 मध्ये ही अभिनेत्री शेवटची पडद्यावर दिसली होती. (pc:sonamkapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्नानंतर आणि एक मूल झाल्यानंतर तिने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले आणि लंडनमध्ये तिच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायला सुरुवात केली.(pc:sonamkapoor/ig)
अभिनेत्री अनेक प्रसंगी भारताला भेट देते. नुकतीच ती तिच्या मित्राच्या लग्नात दिसली होती. यावेळी ती अतिशय सुंदर अवतारात दिसली. (pc:sonamkapoor/ig)
तिच्या लाल साडीने लोकांची मने जिंकली. नेहमीच आपल्या फॅशनने लोकांची मने जिंकणाऱ्या सोनम कपूरने पुन्हा एकदा लोकांना तिचं कौतुक करायला भाग पाडलं.(pc:sonamkapoor/ig)
सोनम कपूरने स्वतः सांगितले की, तिची ही साडी 35 वर्षे जुनी आहे, जी तिने तिच्या आईकडून घेतली आहे. (pc:sonamkapoor/ig)
या खास साडीला घरचोळा म्हणतात. ही गुजरातची पारंपारिक साडी आहे, जी लोक लग्नासारख्या प्रसंगी घालतात. ही साडी एक स्टेटमेंट पीस आहे, जी नववधूंना आवडते. गुजराती परंपरेत या साडीला विशेष महत्त्व आहे.(pc:sonamkapoor/ig)
लग्नाच्या तिसऱ्या फेरीनंतर वधूला सासू-सासऱ्यांकडून घरचोळा साडी भेट दिली जाते. (pc:sonamkapoor/ig)
सोनम कपूर तिच्या मैत्रिणीच्या लग्नात लाल रंगाची साडी परिधान करताना दिसली होती. या साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.(pc:sonamkapoor/ig)