Kajal Aggarwal Pregnant : काजल अग्रवाल आणि गौतम किचलू लवकरच आई-बाबा होणार?

Kajal Aggarwal Pregnant : सिंघम गर्ल काजल अग्रवाल आणि गौतम किचलू लवकरच आई-बाबा होणार आहेत. (photo: kajalaggarwalofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांनी अधिकृतपणे यासंदर्भात माहिती दिली आहे. काजलचा फोटो शेअर करत गौतमने लिहिले आहे,2022 तुझ्याकडे पाहत आहे. त्यासोबत त्याने गर्भवती महिलेचा इमोजीदेखील शेअर केला आहे. गूढ पद्धतीने त्यांनी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. (photo: kajalaggarwalofficial/ig)

काजलने अद्याप यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु तिने शेअर केलेल्या फोटोद्वारे ती गर्भवती असल्याचा अंदाज लावला जात आहे. (photo: kajalaggarwalofficial/ig)
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला काजलने तिच्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली होती. (photo: kajalaggarwalofficial/ig)
काजलचा पती गौतम किचलू हा एक इंटिरियर डिझाइनर आहे आणि त्याचं एक ऑनलाईन स्टोअर आहे. (photo: kajalaggarwalofficial/ig)
काजल अग्रवाल आणि गौतम किचलूने अलीकडेच लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. (photo: kajalaggarwalofficial/ig)