Neha Kakkar- Rohanpreet Singh : प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा आज वाढदिवस, जाणून घ्या नेहाची प्रेमकहाणी!
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर तिच्या गायिकी आणि खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा आज जन्मदिवस आहे.यानिमित्त तिच्या रंजक प्रेम कहाणीवर नजर टाकूया
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या पार्श्वगायनाच्या बळावर नेहा कक्करने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहाचा 6 जून, 1988 रोजी जन्म झाला. आज नेहा आपला 35 वा जन्मदिवस सेलिब्रेट करत आहे. तिने खूप कमी वयात आपल्या गाणं गाण्यास सुरुवात केली होती. तिने ऑक्टोबर 2020 मध्ये पंजाबी गायक रोहनप्रीत सिंह याच्याशी विवाह केला होता.
पण विवाहापूर्वी नेहा आणि रोहनप्रीत काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिले होते. पण तुम्हाला माहिती आहे का? रोहनप्रीतने एका वेगळ्याच कारणामुळे नेहा कक्करसोबत विवाह करण्यासाठी नकार दिला होता.
याबाबत नेहा कक्करने 'द कपिल शर्मा शो'मध्ये किस्सा शेअर केला होता. याचं कारण प्रेमाच्या नात्यात असताना सुरुवातीला नेहाने रोहनप्रीत याला सांगितलं होतं की, तिला दीर्घकाळ कोणत्याही नात्यामध्ये राहायचं नाही, तर लग्न करायचं आहे.
ही गोष्ट ऐकताच रोहतप्रीत सिंहला थोडी भीतीच वाटली होती. याचं कारण त्यावेळी रोहनप्रीत 25 वर्षाचा होता. यानंतर रोहनप्रीतने नेहा कक्करला लग्न करण्यास नकार दिला होता
यानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं. मात्र एक दिवस दारुच्या नशेत रोहनप्रीतने नेहा कक्करला कॉल करुन आपलं प्रेम व्यक्त केलं. यावेळी त्याने नेहाला लग्नाची मागणी घातली होती.
मात्र नेहा कक्करने रोहनप्रीतची गोष्ट फारशी मनावर घेतली नाही. यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी दोघांची भेट झाली तेव्हा रोहनप्रीतने सांगितले की, मला खरचं लग्न करायचं आहे. यानंतर नेहाने विश्वास वाटल्यानंतर रोहनप्रीतशी लग्नासाठी होकार दिला.
यानंतर कुठे नेहा आणि रोहनप्रीत यांची प्रेमकाहाणी लग्नापर्यंत पोहोचली आणि ऑक्टोबर, 2020 मध्ये दोघेजण विवाहबंनात अडकले.