Sidharth Kiara Pics : सिद्धार्थ-कियाराचं मुंबईत आगमन; येलो ड्रेसमध्ये खुलून दिसलं नववधू कियाराचं सौंदर्य, पाहा फोटो
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांची ही छायाचित्रे मुंबई विमानतळावरील आहेत. या दोघांनी मीडियासाठी पोज दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्नानंतर सिद्धार्थ पहिल्यांदाच आपली नववधू कियाराला घेऊन दिल्लीहून मुंबईत परतला आहे.
या फोटोंमध्ये कियारा आडवाणी पिवळ्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
कियाराने कपाळाला सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्या घातल्या आहेत. ज्यामुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसतोय.
या फोटोंमध्ये कियाराबरोबर ऑफ व्हाईट कुर्ता परिधान केलेला सिद्धार्थ खूपच हॅंडसम दिसत होता.
लग्नानंतर मीडियाला एकत्र पोज देताना हे कपल खूपच क्यूट दिसत आहे.
एअरपोर्टवर पोहोचल्यावर कियारा आणि सिद्धार्थने सर्वात आधी मीडियाला लग्नाची मिठाई दिली.
दिल्लीतील रिसेप्शननंतर आता सिद्धार्थ-कियारा 12 फेब्रुवारीला मुंबईत बॉलिवूड स्टार्ससाठी रिसेप्शन देणार आहेत.