Sumangalam Mohotsav : कणेरी मठावरील सुमंगलम लोकोत्सव तयारी अंतिम टप्प्यात; मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कणेरी मठावर होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सव तयारीचा आढावा घेतला. यावेळी श्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी जल,वायू,अग्नी,पृथ्वी,आकाश या पंचतत्त्वांची माहिती दिली.
Sumangalam Mohotsav at kaneri math
1/13
1350 वर्षाहून अधिक परंपरा लाभलेल्या सिद्धगिरी मठ, कणेरीत ‘सुमंगलमपंच महाभूत लोकोत्सव’ 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे.
2/13
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धगिरी मठावर पाहणी केली.
3/13
काडसिद्धेश्वर महाराजांच्या प्राचीन मंदिरात दर्शन घेवून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली.
4/13
मठाने आजपर्यत आध्यात्म, कृषी, पारंपरिक शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, संस्कृती रक्षण, गोसंवर्धन, संशोधन आणि आपत्ती व्यस्थापन अशा अनेक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
5/13
जगाला दीपस्तंभाप्रमाणे हा लोकोत्सव दिशादर्शक होईल, असा सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित केल्याचेही ते म्हणाले.
6/13
कोल्हापुरातील सिद्धगिरी मठात सुमंगलम लोकोत्सव होत आहे ही आपल्या राज्यासाठी गौरवाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
7/13
सुमारे 650 एकर इतक्या विशाल परिसरात उत्सवाची तयारी सुरू असून ही तयारी आता अंतिम टप्यात आली आहे.
8/13
या उत्सवाला 30 लाखांवर लोक सहभागी होणार आहेत अशी शक्यता आहे.
9/13
काडसिदेश्वर स्वामींनी महोत्सवाला येताना सोबत एक किलो प्लास्टिक कचरा सोबत आणण्याचे आवाहन केले आहे.
10/13
गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून रिसायकलिंग युनिटद्वारे त्या कचऱ्याची पुनर्निमिती प्रक्रिया लोकांना पाहता येणार आहे .
11/13
मुख्यमंत्र्यांनी पृथ्वी,जल,अग्नी, वायू आणि आकाश या तत्वांच्या गॅलरी, मुख्य सभा मंडप सोबतच सोळा संस्कार, आरोग्य अशा गॅलरीना भेट देवून पाहणी केली.
12/13
यावेळी त्यांनी सिद्धगिरी गोशाळा, सिद्धगिरी हॉस्पिटल व सिद्धगिरी गुरुकुलमला भेट देत विविध प्रकल्पांची पाहणी केली व मठावर होणाऱ्या लोकोपयोगी प्रकल्पांचे कौतुक केले.
13/13
सिद्धगिरी गुरुकुलमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोर प्राचीन 14 विद्या व 64 कलांचे प्रात्यक्षिक सादर केले.
Published at : 11 Feb 2023 05:51 PM (IST)