PHOTO: श्वेता तिवारी जगते लग्झरी लाईफ, जाणून घ्या अभिनेत्रीचे कार कलेक्शन!
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हे आज प्रत्येक घराघरात प्रसिद्ध नाव आहे. श्वेता नुकत्याच प्रसारित झालेल्या रिअॅलिटी टीव्ही सीरियल 'खतरों के खिलाडी 11' मध्ये देखील दिसली होती. ज आपण श्वेताच्या आयुष्याशी संबंधित अशा काही पैलूंवर एक नजर टाकणार आहोत तसेच अभिनेत्रीच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत…(photo:shweta.tiwari/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्वेता तिवारीने केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्वेता तिवारीने एक-दोन नव्हे तर 7 बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.(photo:shweta.tiwari/ig)
'कसौटी जिंदगी के' या टीव्ही सीरियलमधून श्वेता तिवारीला घरोघरी ओळख मिळाली. या टीव्ही मालिकेनंतर श्वेताच्या लोकप्रियतेत कमालीची झेप घेतली होती. अभिनेत्री टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 4 मध्ये देखील दिसली आहे आणि या शोची ती विजेती होती.(photo:shweta.tiwari/ig)
श्वेता तिवारीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर ते खूप चढ-उतारांनी भरलेले आहे. अभिनेत्रीने दोन लग्ने केली होती पण दोन्ही अयशस्वी ठरली.(photo:shweta.tiwari/ig)
जर आपण श्वेता तिवारीच्या कार कलेक्शनबद्दल बोललो तर अभिनेत्रीकडे बीएमडब्ल्यू 7 सीरीजची कार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारची किंमत जवळपास 1.38 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीकडे ऑडीची A4 सीरिजची कार देखील आहे. या कारची किंमत सुमारे 47 लाख रुपये आहे.(photo:shweta.tiwari/ig)
या दोन गाड्यांसोबतच श्वेता तिवारीकडे ह्युंदाईची सेंट्रो कारही आहे, ज्याची किंमत 6 लाख रुपये आहे.(photo:shweta.tiwari/ig)