शिवजन्मभूमीत शिवाजी महाराजांची 3D प्रतिमा रांगोळीतून रेखाटली
शिवजन्मभूमी अर्थात पुण्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची थ्री डी प्रतिमा रांगोळीने साकारण्यात आलीये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवजयंती निमित्त महाराजांना या कलाकृतीद्वारे अभिवादन करण्यात आलं.
एबीपी माझाच्या प्रेक्षकांना या रांगोळीचं दर्शन ड्रोनच्या माध्यमातून आम्ही घडवत आहोत.
शिवाजी महाराजांची इतकी मोठी थ्री डी रांगोळी प्रथमतःच साकारण्यात आल्याचा दावा केला जातोय.
तसा विश्वविक्रम नोंदविण्यासाठी पासष्टहून अधिक कलाकारांनी तीन दिवस परिश्रम घेतलेत.
शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या तीस हजार चौरस फूट प्रांगणात, बारा टन रांगोळीचा वापर करत ही प्रतिमा रेखाटण्यात आली. या थ्री डी रांगोळीत शिवाजी महाराज आणि राजमुद्रेला आज्ञापत्रावर स्थान देण्यात आलंय.
पाहताच क्षणी जणू एखाद्या भव्यदिव्य भिंतीवरची ही प्रतिमा असल्याचा भास होतो.
शिवसेनेचे नेते शरद सोनवणेच्या संकल्पनेतून ही अनोखी थ्री डी रांगोळी सत्यात अवतरली.