Makar Sankranti 2025: संक्रांतीनिमित्त सईने केलं भन्नाट फोटोशूट; पाहा फोटो!
उत्तम अभिनय जिद्द, चिकाटीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीच नाही, तर बॉलिवूडमध्येही स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछोट्या पडद्यावरुन सुरुवात करणारी सई तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठ्या पडद्यारपर्यंत पोहोचली आहे.
छोट्या पडद्यावरील या गोजिरवाण्या घरात या मालिकेपासून सईने अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही.
बोल्ड, ग्लॅमरस, बिनधास्त अशी सई ताम्हणकरची ओळख. छोट्या पडद्यावरुन तिने मोठ्या पडद्यावरही मोठ्या दिमाखात एन्ट्री मारली.
सईच्या बोल्डनेसमुळे तिला अनेकदा टीकेलाही सामोरं जावं लागलं, पण सईने याचा परिणाम स्वत: वर होऊ दिला नाही आणि आपली वेगळी ओळख निर्माण केली.
सई नेहमीच तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहेत, ज्यात तिने मकर संक्रांती निमित्त खास फोटोशूट केलं आहे.
या फोटोंना तिने ‘हॅप्पी संक्रांत’ असे फोटो कॅप्शन दिले आहे.
सई ताम्हणकर फॅशन आयकॉन आहे. तिचा स्टायलिश लूक नेहमीच चर्चेत असतो. परफेक्ट साडी असो किंवा मग वेस्टर्न ड्रेस, सई प्रत्येक आऊटफिटमध्ये तितकी ग्लॅमरस दिसते.