PHOTO : Sai Pallavi आणि नागा चैतन्याची ही 'Love Story' पाहिलीय का?
अभिनेत्री सई पल्लवी आणि नागा चैतन्य यांच्या भूमिका असलेला 'लव्ह स्टोरी' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावाकडून हैदराबादला आलेल्या रेवांत आणि मोनिका यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
रेवांतची झुंबा डान्स अकॅडमी असते, मोनिका त्यामध्ये जॉब करत असते. नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.
या दोघांचेही धर्म आणि जाती वेगवेगळ्या असल्याने त्यांच्या या लव्ह स्टोरीसमोर अनेक अडचणी उभ्या राहतात.
या दोघांच्या प्रेमाचे वेगवेगळे रंग आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवायला मिळतील.
या चित्रपटातील नागा चैतन्य आणि सई पल्लवीच्या भूमिकेचे कौतुक केलं जात आहे.
सई पल्लवीची गणना ही अत्यंत गुणी अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिने टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे.