'या' कारणामुळे विराट आणि अनुष्कानं वामिकाचा चेहरा सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला..

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) यांना गेल्या वर्षी कन्यारत्न प्राप्त झालं. अनुष्का आणि विराटनं त्यांच्या मुलीचे नाव वामिका (Vamika Kohli) असं ठेवलं.(photo: @anushkasharma/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अनुष्का आणि विराट हे सोशल मीडियावर वामिकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. पण त्यांच्या पोस्टमध्ये वामिकाचा चेहरा दिसत नाही.(photo: @anushkasharma/ig)

विराट आणि अनुष्कानं वामिकाचा चेहरा सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीमध्ये अनुष्कानं वामिकाला स्पॉटलाईटपासून दूर ठेवण्याचं कारण सांगितलं होतं. (photo: @anushkasharma/ig)
2020 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनुष्का म्हणाली, 'आम्ही याचा खूप विचार केला आहे. आम्ही आमच्या मुलीला लोकांच्या नजरेत राहावं, असं वाढवणार नाही. तिने सोशल मीडियामध्ये गुंतून रहावं, असं आम्हाला वाटत नाही. कोणत्याही मुलाला इतरांपेक्षा खास करु नये. हे करणं कठिण आहे पण आम्ही हा नियम फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहोत.' अनुष्का आणि विराट यांच्या सोशल मीडिया पोस्टला नेटकऱ्यांची नेहमी पसंती मिळते.(photo: @anushkasharma/ig)
2017 मध्ये अनुष्कानं क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये 11 जानेवारी रोजी मुलगी वामिकाला जन्म दिला. गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं चित्रपटातून ब्रेक घेतला होती. (photo: @anushkasharma/ig)
अमुष्काने बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. लवकरच अनुष्काचा चकदा एक्सप्रेस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या ती या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाची निर्मीती अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच क्लीन स्लेट फिल्मझ यांनी केली आहे. या प्रोडक्शन हाऊसने एनएच 10 आणि परी या चित्रपटांची देखील निर्मीती केली आहे. चकदा एक्सप्रेस या चित्रपटत अनुष्का क्रिकेटर झूलन गोस्वामी यांची भूमिका साकारणार आहे.(photo: @anushkasharma/ig)