ashadhi wari 2022: अवघा रंग एक झाला... वारकऱ्यांनी दुमदुमली आळंदी नगरी, पहा फोटो
Dnyaneshwar maharaj Palkhi Prasthan 2022 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सोहळ्यासाठी आळंदी नगरी सज्ज झाली आहे. आज सायंकाळी 4 वाजता पालखीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दोन वर्षापासून पायी वारी झाली नव्हती. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी झाल्यानं पायी वारीला परवानगी देण्यात आली असून, शासनानं सर्व निर्बंध हटवले आहेत.
वारीत लहानग्यांची देखील लगबग दिसते आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
. कालच संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. आज ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्यानं इंद्रायणी काठ वारकऱ्यांच्या उपस्थितीनं गजबजून गेला आहे.
आळंदीत किमान 4 लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान व प्रशासनाच्या वतीने पायी वारी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
image 7
image 8