Sushant Singh Rajput: 'रामलीला'पासून 'हाफ गर्लफ्रेंड'पर्यंत चित्रपटांसाठीची पहिली पसंती होता सुशांत
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं वर्षभरापूर्वी जगाचा निरोप घेतला. पण, कलाविश्वातील आणि चाहत्यांच्या मनातील त्याचं स्थान अबाधित आहे. सुशांतच्या कारकिर्दीत त्याच्या काही चित्रपटांना प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. असं असलं तरीही त्याच्या कारकिर्दीत काही मोठ्या चित्रपटांना तो मुकला होता, ही बाबही खरी. अर्थात त्यामागे विविध कारणं होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय लीला भन्साळी यांच्या 'रामलीला' या चित्रपटासाठी सुशांत पहिली पसंती होता. पण, यशराज फिल्म्ससोबत बिघणाऱ्या नात्यामुळं तो या संधीला मुकला होता.
संजय लीला भन्साळी यांनी सुशांतला 'राम-लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांची ऑफर दिल्याचं पोलीस तपासात सांगितलं होतं. परंतु तारखांच्या कारणामुळं तो या चित्रपचटांचा भाग होऊ शकला नव्हता.
यशराज फिल्म्स या बॅनरअंतर्गत साकारलेल्या 'बेफिक्रे' या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाल नव्हती. रणवीर या चित्रपटातून झळकला असला तरीही सुशांतला या चित्रपटासाठी प्रथम पसंती देण्यात आली होती.
अभिनेता जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असणाऱ्या 'जॉन अकबर वॉल्टर' या चित्रपटासाठीही सुशांत पहिली पसंती होता. परंतु पुन्हा एकदा वेळापत्रकाची आखणी योग्य रितीनं होत नसल्यामुळं अखेरच्या क्षणी तो या चित्रपटापासून वेगळा झाला.
'हाफ गर्लफ्रेंड' या चित्रपटासाठी अर्जुनच्या आधी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला ऑफर देण्यात आली होती. परंतु दिनेश विजनच्या चित्रपटासाठी सुशांतनं या चित्रपटाला सोडलं होतं.
आदित्य रॉय कपूर याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'फितूर' या चित्रपटाची ऑफरही सुशांतलाच मिळाली होती. अभिषेक कपूर या चित्रपटाची सुरुवात करणार, तोच सुशांतनं यातून काढता पाय घेतला.