Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO: मालदीवचा ऐवजी भारतातच लग्न करणार; रकुल प्रीत-जॅकी भगनानीच्या वेडिंग कार्डचे फोटो व्हायरल!
ध्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. आमिर खानची (Amir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) नुकतीच नुपूर शिखरेसोबत विवाहबंधनात अडकली. (photo:rakulpreet/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच मराठी सिनेसृष्टीतही अनेक कलाकार मंडळी ही लग्नबंधनात अडकत आहे. बॉलीवूड कपल रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानीच्या (Jackky Bhagnani) लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती.(photo:rakulpreet/ig)
तसेच आता त्यांच्या वेडिंग कार्ड (Wedding Card) फोटो देखील सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न हे समुद्रकिनारी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. (photo:rakulpreet/ig)
खरंतर रकुल आणि जॅकीने त्यांच्या लग्नासाठी मालदीवचा विचार केला होता असं सांगण्यात येत होतं. पण मालदीव आणि भारत वाद सुरु झाला आणि रकुल आणि जॅकीला भारतातच लग्न करण्याचा सल्ला दिला(photo:rakulpreet/ig)
त्यानुसार रकुल आणि जॅकीने भारतातच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रकुल आणि जॅकीच्या घरी त्यांच्या लग्नाची देखील तयारी सुरु करण्यात आली आहे.(photo:rakulpreet/ig)
तसेच हे दोघे गोव्यात लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. कारण गोवा हे या जोडप्यासाठी अत्यंत खास असल्याचं म्हटलं जातं. कारण गोव्यापासूनच या दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. (photo:rakulpreet/ig)
रकुल आणि जॅकीच्या वेडिंग कार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे कार्ड गुलाबी आणि निळ्या रंगाचे आहे. ते पाहता हे लग्न समुद्रकिनारी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (photo:rakulpreet/ig)
रकुल आणि जॅकीचा हॅशटॅग खूप वेगळा आहे. त्यांच्या कार्डवर लिहिले आहे- #ABDONOBHAGNA-NI. (photo:rakulpreet/ig)
दोघेही 21 फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. लग्नानंतर अद्याप रिसेप्शनचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. (photo:rakulpreet/ig)