Radhika Merchant : गुलाबी बांधणी लेहंगा, त्यावर सोन्याच्या तारेचे नक्षीकाम, नवरीबाई राधिका मर्चंटच्या लुकची चर्चा!
अब्जाधीश मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह येत्या 12 जुलै रोजी होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांच्या विवाहाची सध्या देशभरात चर्चा असून कित्येक दिवसांपासून या विवाहसोहळ्याची तयारी चालू आहे.
या विवाह सोहळ्यापूर्वी वेगवेगळ्या विधी आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूड, क्रिकेट तसेच अन्य क्षेत्रातील दिग्गज उपस्थित आहेत.
दरम्यान, या सोहळ्यादरम्यान अंबानी कुटुंबाची होणारी सुनबाई म्हणजेच राधिका मर्चंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अनंत आणि राधिका यांच्या लग्नविधीसाठी राधिकाने आकर्षक असे कपडे परिधान केले आहेत. राधिकाचे याच कडप्यांतील काही फोटो समोर आले आहेत.
यातील एका फोटोमध्ये राधिका गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसत आहे. तिच्या या लेहंग्याचे नाव बंधणी लेहंगा आहे.
गुलाबी रंगाच्या या लेहंग्यावर सुंदर असे नक्षीकाम केलेले असून त्यावर दुर्गा मातेचे श्लोक आहेत. हे श्लोक काढण्यासाठी सोन्याची तार वापरण्यात आलेली आहे.
हा लेहंगा तयार करण्यासाठी 35 मीटरचे बंधेज (एका प्रकारचे रेशमी वस्त्र) वापरण्यात आले आहे.