R. Madhavan : वजन वाढविण्यासाठी तीन महिने खाल्ला फक्त केक, आर माधवनने अशी घेतली होती मेहनत
आता या अभिनेत्याने त्याच्या एका चित्रपटासाठी वजन वाढवल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर माधवन याने साऊथपासून बॉलीवूडपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
आर माधवनने कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला की, त्याने एका चित्रपटासाठी वजन लवकर कसं वाढवलं आणि नंतर ते कमीही केलं.
कर्ली टेल्सशी बोलताना आर माधवनने सांगितले की, रॉकेट्री या चित्रपटासाठी त्याने अप्लाइड किनेसियोलॉजी पद्धतीच्या मदतीने वजन वाढवले होते.
त्यावर त्याने म्हटलं की,'मी माझे वजन कसे वाढवू शकतो आणि ते लवकर कसे कमी करू शकतो हे जाणून घेण्यासाठी मी खूप संशोधन केले.'
पुढे त्याने म्हटलं की, 'संशोधनाने मला अप्लाइड किनेसियोलॉजी नावाची चाचणी दिली, जी आपल्यापैकी प्रत्येकाला सांगते की आपण कोणत्याही वेळी कसे आहोत.
अभिनेता पुढे म्हणाला, तीन महिने मी फक्त केक खाल्ले, माझ्यासाठी जे योग्य तेच खाल्ले. त्यानंतर माझं वजन इतकं वाढलं की मला खाली वाकणंही कठिण होत होतं.
'त्यानंतर मी फक्त तेच खाल्ले जे माझ्या शरीरासाठी चांगले होते. व्यायाम नाही, धावणे नाही, शस्त्रक्रिया नाही, औषधही घेतली नाहीत.'
2022 मध्ये रिलीज झालेल्या 'रॉकेटरी' या चित्रपटाला ऑस्कर 2023 साठीही नामांकन मिळाले होते.
या चित्रपटात आर माधवन केवळ मुख्य अभिनेता म्हणून दिसला नाही तर त्याने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.