Prajakta Mali : तरुणांची क्रश असलेल्या प्राजक्ता माळीचं शिक्षण तरी किती?
Prajakta Mali : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी तुफान चर्चेत आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर देत माफी मागण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार देखील केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी माफी मागितली होती. त्यानंतर प्राजक्ता माळी हिने देखील त्यांचे आभार मानले होते.
दरम्यान, मराठा नाटक, चित्रपट , मालिका आणि हास्य जत्रा या शोच्या सूत्रसंचालन काम करत असताना प्राजक्ता माळी महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली.
इतकचं नाही, तर अनेक तरुणांची क्रश देखील बनली. दरम्यान, सिनेक्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या प्राजक्ता माळीच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊयात....
प्राजक्ताने पुण्यातील कॅप्टन शिवरामपंत दामले या हायस्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर तिने ललित कलाकेंद्रच्या परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.
पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून प्राजक्ताने पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले
तिने शालेय जीवनापासूनचं भरतनाट्यमचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. 2011 पासून तिने सिनेक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.