Health Tips : वजन कमी करायचंय? खजुराचं सेवन करा; मिळतील अनेक फायदे
खजूर (Dates) खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. खजूरचे तसे अनेक फायदे आहेत. पण, सर्वात महत्वाचं म्हणजे खजूर खाल्ल्याने वजन कमी होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखजूरमध्ये आहारातील फायबर, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम आणि इतर अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे पोषक घटक वजन कमी करण्यात खूप मदत करतात.
खजूर खाल्ल्याने चयापचय गतिमान होते. यामुळे तुमची कॅलरी जास्त बर्न होते.
खजूर खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही. पोट भरलेले राहते आणि तुम्ही अस्वास्थ्यकर पदार्थ खाणे टाळा.
वजन कमी करण्यासाठी खजूर खात असाल तर लक्षात ठेवा खजूर सकाळी किंवा दिवसभरात खावेत. सकाळी खजूर खाल्ल्याने दिवसभरातील कॅलरी नियंत्रणात राहते.
वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी खजूर खा. यासाठी 3-4 खजूर रात्री भिजत ठेवा आणि सकाळी नाश्त्यात इतर ड्रायफ्रुट्ससोबत खा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.