Shark Tank India: एका एपिसोडसाठी Asheer Grover घेतोय दहा लाख, जाणून घ्या इतरांचे मानधन
अमेरिकन रिअॅलिटी कार्यक्रमावर आधारीत असलेला हा कार्यक्रम भारतात 'शार्क टँक इंडिया' या नावाने प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात देशातील मोठे सात उद्योगपती परीक्षक म्हणून सहभागी झाले आहेत. पाहूयात यांचे मानधन किती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशार्क टँक इंडियाच्या परीक्षकांच्या यादीत पहिले नाव आहे अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांचे. अश्नीर हे फिनटेक फर्म ‘भारतपे’चे सह-संस्थापक आणि एमडी आहेत. त्यांनी आयआयटी दिल्ली आणि आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण घेतले आहे. अश्नीर यांची एकूण संपत्ती 700 कोटी आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार एका एपिसोडसाठी Asheer Grover तब्बल दहा लाक रुपये मानधन घेतात.
अनुपम मित्तल हे 'PeopleGroup-Shaadi.com'चे संस्थापक आणि सीईओ आहेत. अनुपम मित्तल हे आता भारतातील ई-कॉमर्स उद्योगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक बनले आहेत. मिडिया रिपोर्ट्सनुसार, अनुपम मित्तल एका एपिसोडसाठी जवळपास सात लाख रुपयांचे मानधन घेतात.
BOAT या कंपनीचे अमन गुप्ता को- फाऊंडर आणि मार्केटिंग डायरेक्टर आहेत. अमन यांनी दिल्ली यूनिवर्सिटीमधून BBA केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अमन गुप्ता एक एपिसोडसाठी 9 लाख रुपये मानधन घेतात.
विनिता सिंह या SUGAR कॉस्मेटिक्सच्या सीईओ आणि सह-संस्थापक आहेत. त्यांनी आयआयटी आणि आयआयएममधून शिक्षण घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विनिता सिंह एका एपिसोडसाठी पाच लाख रुपये मानधन घेतात.
नमिता थापर या एमक्यूर फार्मास्युटिकल या जागतिक औषध कंपनीच्या सीईओ आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार नमिता थापर एका एपिसोडसाठी आठ लाख रुपये मानधन घेतात.
पियुष बन्सल हे 'लेन्सकार्ट’चे सीईओ आणि संस्थापक आहेत. सप्टेंबर 2019 पर्यंत, लेन्सकार्टचे भारतातील 70हून अधिक शहरांमध्ये स्टोअर्स होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार पियुष बन्सल एका एपिसोडसाठी सात लाख रुपये मानधन घेतात.
मामाअर्थ या प्रसिद्ध कमपनीची गजल अघल या को- फाऊंडर आहेत. त्यांनी न्यूयॉर्क अॅकॅडमी ऑफ आर्ट्समधून मॉर्डन आणि डिझाइन- अप्लाइट आर्ट हा कोर्स केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार गजल अघल एका एपिसोडसाठी आठ लाख रुपये मानधन घेतात.