Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO: 'पंचायत 2' फेम अभिनेत्री आंचल तिवारीच्या निधनाच्या चर्चा; सत्य आलं समोर!
'पंचायत 2' (Panchayat) फेम अभिनेत्री आंचल तिवारीचं निधन झाल्याची बातमी समोर आली होती. रस्ते अपघातात अभिनेत्रीसह आणखी 9 जणांना आपला जीव गमवावा लागल्याचं समोर आलं होतं. .(photo:anchalt555/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण आता या अपघातात निधन झालेली आंचल तिवारी वेळगी असल्याचं समोर आलं आहे. 'पंचायत' फेम अभिनेत्रीने 'मैं जिंदा हूँ' म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे.(photo:anchalt555/ig)
आंचल तिवारीने 'पंचायत 2'मध्ये प्रधानजीच्या मुलीच्या मैत्रीणीची भूमिका साकारली होती. त्यावेळी ती चांगलीच चर्चेत आली होती. .(photo:anchalt555/ig)
अशातच आता निधनाच्या बातमीने ती पुन्हा चर्चेत आली. पण ही निधनाची बातमी खोटी असल्याची माहिती आंचलने स्वत: व्हिडीओ शूट करुन चाहत्यांना दिली आहे. तसेच ज्या आंचल तिवारीचं निधन झालं आहे ती भोजपुरी अभिनेत्री आहे. .(photo:anchalt555/ig)
आंचल तिवारीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना खरी बातमी दिली आहे. मृत्यूच्या अफवांबद्दल बोलताना आंचल तिवारी म्हणाली,नमस्कार माझं नाव आंचल तिवारी आहे. 'पंचायत' फेम अभिनेत्रीचं निधन झाल्याची बातमी तुम्ही सकाळी ऐकली. ती आंचल तिवारी एक भोजपुरी अभिनेत्री आहे. 'पंचायत 2'ची आंचल तिवारी मी तुमच्यासमोर आहे. (photo:anchalt555/ig)
आंचल तिवारी पुढे म्हणाली,माझी प्रकृती ठिक आहे. माझ्या निधनाची बातमी ही फेकन्यूज आहे. भोजपुरी सिनेमांचा आणि माझा काहीही संबंध नाही. (photo:anchalt555/ig)
मी हिंदी सिनेमे करते. हिंदी रंगमंचावर काम करते. त्यामुळे मला भोजपुरी अभिनेत्री म्हणू नका. या गोष्टीचा मला मानसिक त्रास होत आहे. पुनम पांडेसोबत लोक माझी तुलना करत आहेत. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे.(photo:anchalt555/ig)
'पंचायत'चा पहिला आणि दुसरा सीझन सुपरहिट झाला होता. दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. 'पंचायत 2' सीरिज झाल्यापासूनच चाहते 'पंचायत 3'ची प्रतीक्षा करत आहेत. (photo:anchalt555/ig)
'पंचायत 3'चं शूटिंग पूर्ण झालं असून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पण अद्याप या सीरिजची अधिकृत रिलीज डेट समोर आलेली नाही. (photo:anchalt555/ig)