Rani Mukerji Birthday: जाणून घेऊया राणी आणि आदित्यच्या इंटरेस्टिंग लव्ह स्टोरीबद्दल!
बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने 90 च्या दशकात तिच्या सुंदर आणि अप्रतिम अभिनयाने लाखो चाहत्यांच्या हृदयावर जादू केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'राजा की आयेगी बारात'मधून डेब्यू केल्यानंतर राणी मुखर्जीने अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
आदित्य चोप्रा यांनी बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) हिच्याशी लग्नगाठ बांधली.
आदित्य आणि राणीची ही लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.
आदित्य स्वभावाने खूप शांत आहे, तर राणी एकदम चुलबुली.. आधी त्या घोघांची केवळ मैत्री होती. दोघांचे एकमेकांशी चांगले बॉन्डिंग होते, पण मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते दोघांनाही कळले नाही.
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा पहिल्यांदा एका रेस्टॉरंटमध्ये भेटले होते. त्यावेळी राणीने 'राजा की आयेगी बारात' चित्रपटात काम केले होते.
पहिल्याच भेटीतच आदित्य राणीच्या प्रेमात पडले होते. यानंतर त्यांनी चित्रपट निर्माता करण जोहरला राणीला 'कुछ कुछ होता है'मध्ये कास्ट करण्यास सांगितले.
आदित्य चोप्रा यांचे वडील यश चोप्रा यांना त्यांचे राणी मुखर्जीसोबतचे नाते अजिबात पसंत नव्हते, असे म्हटले जाते. (pc:राणी मुखर्जी/ इंस्टाग्राम)