'नमस्कार मंडळी...' पैठणी, कपाळावर चंद्रकोर अन् हिरव्या बांडग्या; नीता अंबांनींचा मराठमोळा साज पाहाच
अपूर्वा जाधव
Updated at:
08 Apr 2024 04:43 PM (IST)
1
मुंबईतील नीता अंबानी कल्चरल सेंटरला नुकतच एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने तिथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या कार्यक्रमाची सूत्र स्वत: नीता अंबानी यांनी साभांळली होती.
3
या कार्यक्रमाची सुरुवात करताना नीता अंबानी यांनी मराठीतून सुरुवात केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'नमस्कार मंडळी कसे आहात?'
4
पण यावेळी त्यांच्या मराठमोळ्या सौंदर्याने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं.
5
यावेळी नीता अंबानी यांनी निळ्या रंगाची पैठणी नेसली आहे. त्यावर हिरव्या बांगड्या, कपाळावर चंद्रकोर आणि केसात गजरा होता.
6
अंबानी कुटुंबातील मोठी सून आणि मुकेश अंबानी यांच्या पत्नी असलेल्या नीता अंबानी यांच्या साड्यांच्या नेहमीच चर्चा होत असतात.
7
नीता अंबानी यांचं पैठणीवरचं प्रेम हे कायमच चर्चेत आलं आहे.