Mouni Roy Wedding Looks : वधूच्या अवतारात खुलून दिसतंय मौनी रॉयचं रूप, संगीतपासून ते लग्नापर्यंत पाहा तिचा लूक
Mouni Roy Wedding Ceremony Looks:अलीकडेच अभिनेत्री मौनी रॉयने (Mouni Roy)तिचा लॉंगटाईम बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar)लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मौनीने तिच्या लग्नात वेगवेगळे लूक केले. चला तर मग तिच्या लग्नातील वेगवेगळ्या लूक्सवर एक नजर टाकूया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमौनी रॉयच्या लग्नाची बातमी कळताच चाहते तिच्या लग्नाच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत होते. मौनीचा सगळ्यात पहिला फोटो हळदी समारंभातला आहे. यामध्ये पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या ड्रेसवर मौनीने सुंदर फ्लोरल ज्वेलरी घातली आहे.
दुसरे फंक्शन मौनी रॉयच्या मेहेंदी सेरेमनीचे होते. यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस कॅरी केला आहे. या ड्रेसला टॅसल वर्क केले होते. मौनीने या ड्रेसबरोबर मांग टिका आणि सुंदर कानातले घातले होते.
मौनी रॉय आणि सूरजचे लग्न साऊथ इंडियन पद्धतीने झाले. सकाळचे एक फंक्शन मल्याळी रितीरिवाजांनुसार घडले, ज्यामध्ये मौनीने पांढर्या रंगाची सुंदर लाल बॉर्डरची साडी नेसली होती. या साडीचं लूक तिच्या दागिन्यांनी अजूनच खुलवलं.
या लग्नाचे विधी देखील बंगाली रितीरिवाजाप्रमाणे पार पडले. लग्नात संध्याकाळी मौनीने लाल रंगाचा लेहेंगा घातला होता. ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.
लग्नानंतर मौनीचा संगीत कार्यक्रम झाला, ज्यामध्ये तिने सुंदर सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यामध्ये मौनी अप्सरापेक्षा कमी दिसत नव्हती.
लग्नानंतर मौनीने मित्र-मैत्रिणींबरोबर पूल पार्टीसाठी ग्रीन मेटॅलिक क्रॉप टॉप आणि बॉडीकॉन स्कर्ट घातला होता. या लूकमध्ये मौनी एखाद्या जलपरीप्रमाणे दिसत होती.