Money Laundering Case प्रकरणाची सुनावणी लांबणीवर, 12 डिसेंबरला Jacqueline Fernandez कोर्टात हजर राहणार
Jacqueline Fernandez: मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने आज पटियाला कोर्टानं हजेरी लावली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाप्रकरणाची सुनावणी 12 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
12 डिसेंबर पर्यंत पटियाला कोर्टानं आरोप सिद्ध कऱण्याचा कालावधी दिला आहे.
मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसह इतर आरोपींविरोधात आरोप सिद्ध करण्यास 12 डिसेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आलाय.
मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सुकेश चंद्रशेखर हा सध्या अटकेत आहे.
सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याप्रकरणात सर्वात आधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचंनाव समोर आले होते. त्यानंतर याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले.
जॅकलिन फर्नांडिला सुकेश चंद्रशेखरनं महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. सुकेशवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.
सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख रूपये होती. तर प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली 36 लाख रूपयांची 4 पर्शियन मांजरं देखील जॅकलिनला देण्यात आली होती.
अनेकांची फसवणूक केल्याचा सुकेशवर आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते.
आता 12 डिसेंबर रोजी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.