PHOTO: 'माझी तुझी रेशीमगाठ'; मीरा - शाहिदच्या फोटोने वेधलं लक्ष!
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतही तिच्या स्टायलिश लूकमुळे खूप चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हटला जाणारा शाहिद कपूर त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो, आता त्याची पत्नी मीरा राजपूतही त्याच्यासोबत चर्चेत आहे.
अनेकदा ती तिच्या लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. आता पुन्हा मीराची स्टायलिश स्टाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मीरा सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे.
अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक इन्स्टाग्रामवर पाहायला मिळते.
मीराने नुकताच हा क्लासी लूक शेअर केलाय. ज्यात ती ब्लॅक साडीमध्ये दिसतेय.
मीराचा हा शाहिदसोबतचा फोटो एकदम परफेक्ट दिसत आहे.
अनेक वेळा शाहिद कपूर आणि मीरा कपूर हे जोडपे चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेत असतात. त्यांच्या आताच्या फोटोनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.