Siddarth Jadhav : 'जत्रा', 'दे धक्का' ते 'सिम्बा'; जाणून घ्या सिद्धार्थ जाधवचा आगामी सिनेमा कोणता?
सिद्धार्थ जाधवने 'जागो मोहन प्यारे', 'तुमचा मुलगा करतो काय' , 'लोच्या झालारे' , 'गेला उडत' या नाटकांमध्ये काम केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'जत्रा', 'दे धक्का', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
सिद्धार्थने 'सिम्बा' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
सिद्धार्थ जाधवचा 'दे धक्का' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता.
सिद्धार्थ जाधव सध्या 'आता होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सिद्धार्थचा 'बालभारती' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवचं नेटवर्थ 10 कोटींचं आहे.
सिद्धार्थचा 'थ्री चिअर्स' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मिथुन चक्रवर्तीच्या ‘अमी शुभाश बोलची’ या बंगाली सिनेमातदेखील सिद्धार्थने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.
सिद्धार्थ जाधवने 'घडलंय बिघडलंय', 'आपण यांना हसलात का?', 'हे तर काहीच नाय' या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येदेखील काम केलं आहे.