Mitali Mayekar :मराठमोळी अभिनेत्री मिताली मायेकरचा भन्नाट लूक, साडीला दिला मॉर्डन टच; पाहा लेटेस्ट फोटो!
अभिनेत्री मिताली मयेकर व अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ही मराठी सिनेसृष्टीतील बेधडक जोडी म्हणून ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मिताली तर तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे विशेष चर्चेत असते
मितालीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
मिताली व सिद्धार्थ ही प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. मिताली सध्या अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे अधिक लोकप्रिय आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच ती स्पष्टपणे तिचे विचार मांडताना दिसते.
मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका फोटोशूटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे
मिताली या फोटोमध्ये साडीत दिसतेय. साडीसोबत हटके ब्लाऊज घालून तिने लूक मॉर्डन केला आहे.
या मोती रंगाच्या साडीत मिताली फारच सुंदर दिसत आहे.
मॅचिंग ज्वेलरी घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
मिताली मयेकर ही एक भारतीय मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे. वयाच्या 13 व्या वर्षी, तिने 2009 मध्ये इरफान खानच्या बिल्लू चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.