PHOTO : श्रीलंकेचं Manike Mage Hite गाणं भारतात हिट, गायिका योहानीवर कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडियामुळे अनेकांचं नशीब पालटल्याचं आपण अनेकदा पाहतो. असचं काहीसं झालं आहे श्रीलंकेतील गायिका आणि रॅपर योहानीसोबत. ती आधीपाहूनच प्रसिद्ध होती, पण काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिचं गाणं 'Manike Mage Hite' प्रचंड व्हायरल होत आहे. (PHOTO : @yohanimusic/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
योहानीने आपला सहकारी गायक-संगीतकार सतीशनसोबत एक गाणं लाँच केले. Manike Mage Hite हे गाणं योहानीनं 22 मे रोजी यूट्यूब चॅनेलवर लाँच केलं. हळूहळू हे गाणे सुपर-डुपर हिट झालं असून केवळ श्रीलंकेतच नव्हे, तर भारतासह इतर देशांमध्येही हे गाणं खूप व्हायरल होत आहे. (PHOTO : @yohanimusic/Instagram)

योहानीनं गायलेलं हे गाणं सिंहली भाषेत आहे. अनेकांना तर त्याचा अर्थही समजत नाही. पण योहानीच्या आवाजाची, संगीताची जादू सर्वांच्या मनावर राज्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे. (PHOTO : @yohanimusic/Instagram)
युट्यूबवर 30 ऑगस्ट पर्यंत, Manike Mage Hite या गाण्याला YouTube वर 75 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (PHOTO : @yohanimusic/Instagram)
सध्या हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर या गाण्याचे वेगवेगळे वर्जन्सही रिलीज केले जात आहेत. सोशल मीडिवर #ManikeMageHite हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. (PHOTO : @yohanimusic/Instagram)
(PHOTO : @yohanimusic/Instagram)
(PHOTO : @yohanimusic/Instagram)