PHOTO : मंदिरा बेदीला ‘आई’ व्हायची वाटायची भीती! कारण माहितीये का?
मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिने केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर यशस्वी मॉडेल, फॅशन डिझायनर आणि टीव्ही प्रेझेंटर म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. मंदिरा बेदी ही अशी अभिनेत्री आहे, जिने 90च्या दशकातील टीव्ही शो 'शांती' द्वारे घराघरात आपला ठसा उमटवला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंदिरा बेदीचा जन्म 15 एप्रिल 1972 रोजी कोलकाता येथे झाला. यावेळी ती तिचा 50वा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. पतीच्या निधनानंतर मंदिरा आता एकटीच दोन मुलांचे संगोपन करत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, एक काळ असा होता जेव्हा मंदिरा बेदी आई बनण्यासाठी घाबरत होती.
'शांती'मधील ग्लॅमर आणि चकाकीपासून दूर राहणारी मंदिरा बेदी आज तिच्या फॅशन आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. 14 फेब्रुवारी 1999 रोजी तिने दिग्दर्शक आणि निर्माता राज कौशलशी लग्न केले.
लग्नाच्या 11 वर्षानंतर, त्यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले. मंदिरा-राज कौशल हे वीरचे पालक झाले. यानंतर मंदिराने जुलै 2020 मध्ये एक मुलगी दत्तक घेतली, तिचे नाव तिने तारा ठेवले.
मंदिरा बेदीला आई होण्याची भीती वाटत होती. तिने स्वतः याचा खुलासा केला होता आणि सांगितले होते की, तिला आधी गर्भधारणेची भीती वाटत होती. कारण देताना, तिने सांगितले की, तिच्या कामाच्या प्रकल्पांमुळे तिला गर्भवती होता आलं नाही.
गर्भधारणेमुळे आपली कारकीर्द संपुष्टात येईल, अशी भीती तिला होती. मंदिराला वाटले की, आई झाल्यानंतर तिला काम मिळणार नाही. (Photo : @mandirabedi/IG)