Reena Madhukar : हृताच्या दुर्गुळेच्या ऑनस्क्रीन बहिणीने केले अमेझिंग फोटोशूट, रीना मधुकरचा घायाळ करणार अंदाज!
कलाकार त्यांची कला ही वेगवेगळ्या माध्यमांतून दाखवत असतात, नवनवे प्रयोग करत असतात. कधी अभिनयात तर कधी त्यांच्या कामाच्या बाबतीत. असाच एक भन्नाट प्रयोग आणि कम्मालss अॅक्टिव्हिटी अभिनेत्री रीना मधुकरने (Reena Madhukar) केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरीनाने नुकतेच अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. रीनाने पाण्याखाली जाऊन, जे फोटोशूट केले त्याचे विशेष कौतुक तिच्या चाहत्यांकडून, सिनेसृष्टीतील कलाकारांकडून होतंय. रीनाच्या या WOW फोटोशूटमुळे बऱ्याच जणांनी तिची ‘मराठी सिनेसृष्टीतील जलपरी’ म्हणून देखील प्रशंसा केली.
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी अंडरवॉटर फोटोशूट केले आहे, पण मराठीत अंडरवॉटर फॅशन फोटोग्राफी करणारी रीना ही पहिली मराठी अभिनेत्री आहे. पाण्याच्या खाली जाऊन फोटोसाठी पोज देणे, चेहऱ्यावरील हावभाव अगदी अचूक दाखवणे ही खरोखर एक कला आहे आणि रीनाने या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट केल्या आहेत.
या प्रकारच्या फोटोशूटमध्ये कपडे, मेकअप याला पण विशेष महत्त्व असते. रीनाची स्टायलिस्ट निकेता बांदेकर, मेकअप आर्टिस्ट निखिल पवार यांनी पण पाण्याखाली कोणत्या प्रकारचं फॅब्रिक जास्त रेखीव दिसेल, पाण्यातही ग्लो दिसेल असा मेकअप आदी गोष्टींचा विचार करुन त्यांनी त्यांची कलाकारी दाखवली. फोटोग्राफर सुमीत गुरवने हे फोटो क्लिक केले आहेत.
फोटोग्राफर सुमीत गुरवने त्याचा अनुभव सांगताना म्हटले की, हा खूप वेगळा आणि छान अनुभव होता. शूट जेवढं इंटरेस्टिंग होतं तितकंच ते चॅलेंजिंग ही होतं. याआधी कधी असं अंडरवॉटर फोटोशूट मी केलं नव्हतं. त्यामुळे खरंतर हे शूट करताना आधी थोडं टेन्शन होतं तितकीच एक्साईटमेंट देखील होती.
सुमीत म्हणाला की, शूट करताना पाण्याखाली जाऊन परफेक्ट टाईमवर क्लिक करणं, तेवढा वेळ बॉडी पाण्याखाली स्टेबल ठेवणं, हे खूप कठीण आहे. पण आम्ही ते उत्साहाने, आनंदाने आणि समाधानाने पूर्ण केलं.