वडील सहाव्या मजल्यावरुन ज्या ठिकाणी कोसळले, तेथेच लेक थांबली; अमृता अरोरा ढसाढसा रडली, Photo's
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमलायका अरोराचे वडील अनिल अरोरा (Malaika Arora Father Death) यांचे निधन झाले आहे. त्यांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समजते आहे.
अनिल यांनी वांद्रे येथील घरातून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
मलायका अरोरा आणि तिची धाकटी बहीण अमृता अरोरा त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर ढसाढसा रडल्या.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये अमृता अरोरा कारमधून खाली उतरल्यानंतर वडिलांच्या घरी जाताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा पती शकील लडकही उपस्थित होता. तर मलायकाचा मुलगा अरहानही दिसला.
अमृता अरोरा गाडीतून खाली उतरताच वडिलांच्या घराजवळ रवाना झाली.
अमृता अरोरा यावेळी वडील अनिल अरोरा सहाव्या मजल्यावरुन ज्या ठिकाणी खाली कोसळले. त्याच ठिकाणी अमृताला अश्रू अनावर झाले.
मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांचे वडील अनिल अरोरा हे मुंबईतील वांद्रे येथील आयशा मनोर बिल्डिंगमध्ये राहत होते. अनिल अरोरा सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.
मृतदेहाजवळून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पीटीआयशी बोलताना अनिलच्या जवळच्या मित्रांनी सांगितले की, ही आत्महत्या नसून अपघात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.