झालं झालं झालं.. केलं केलं केलं.. तुम्ही केलत का?.. आमचं झालं म्हणत मराठी सेलिब्रेटींनी बजावला मतदानाचा हक्क
राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं मतदान सुरु आहे.मराठी कलाकारांनी आपापल्या ठरलेल्या मतदान केंद्रावर जात आपला हक्क बजावताना दिसतायत. अविनाश नारकर यांनीही मतदान केल्याचं सोशल मिडियावर सांगितलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझालं झालं..केलं केलं...असं आपल्या सोशल मीडियावर लिहित प्रशांत दामले यांनी आपण मतदान केल्याचं सांगत पोस्ट केली आहे.
अभिनेत्री स्पहा जोशी हिनंही मतदान झाल्याचं सांगत आपला फोटो सोशल मीडियावर टाकलाय.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी बोटाला शाई टेन्शन नाई असं गाणं टाकत सोशल मीडियावर मुलभूत अधिकार बजावल्याचं दिसलं.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या अभिनेत्रीनंही तिच्या पतीसोबत मतदान केल्याचा फोटाे काढत मतदान झाल्याचं सांगितलंय.
महाराष्ट्राची फुलवंती प्राजक्ता माळी हिनंही तिच्या सोशल मीडियावर मतदान झाल्याचं सांगितलंय.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीही करमाळा विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे.
अमृताने आई सोबत बजावला मतदानाचा अधिकार
शशांक केतकरनेही मतदान केलं आहे.
अभिनेता दिग्दर्शक आदिनाथ कोठारे ने केलं घरच्यांसोबत मतदान
अशोक शिंदे यांनीही त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
पृथ्वीक प्रतापनेही मतदान करत त्याचा हक्क बजावला आहे.
गौरव मोरेनेही त्याचा मतदानाचा हक्क बजावला आहे.